
ब्राह्मण महासंघाच्या गदारोळानंतर अमोल मिटकरींचं तीन शब्दांत उत्तर
सांगलीमधली राष्ट्रवादीची सभा आणि अमोल मिटकरींचं भाषण सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या सभेदरम्यान अमोल मिटकरींच्या भाषणातल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली. ब्राह्मण महासंघाने गदारोळ करत अमोल मिटकरींचा निषेध केला, सुप्रिया सुळेंना घेरावही घातला. याच सगळ्या गोंधळावर मिटकरींनी उत्तर दिलं आहे.
अमोल मिटकरींनी ट्वीट करत या सगळ्या गदारोळावर केवळ तीन शब्दांत उत्तर दिलं आहे. संस्कृतमधली एक ओळ मिटकरी यांनी ट्वीट केली आहे. आपल्या ट्विटमध्ये मिटकरी म्हणतात, "वाचा मौनस्य श्रेष्ठम्". वादावर मौन बाळगणं योग्य आहे, अशा आशयाची प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
हेही वाचा: मिटकरींच्या भाषणाविरोधात पुण्यात ब्राह्मण महासंघाचं आंदोलन
लग्नसोहळ्यातल्या एका विधीदरम्यान म्हटल्या जाणाऱ्या श्लोकाबद्दल अमोल मिटकरींनी आपल्या सभेत विधान केलं होतं. तुमची बायको मला द्या, अशा आशयाचा श्लोक समारंभात म्हटला जातो, असं मिटकरी म्हणाले होते. यावरच ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेत पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. तसंच याच मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घेरावही घातला होता.
Web Title: Amol Mitkari Speech Rashtravadi Congress Brahman Mahasangha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..