Bachchu Kadu: ...तर राणांच्या घरी भांडी घासेन; बच्चू कडू थेट पोलिसांत

Bachchu Kadu
Bachchu Kaduesakal

अमरावतीः अमरावतीमध्ये बच्चू कडू विरुद्ध रवी राणा, असा वाद वरचेवर रंगत आहे. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांविरोधात बच्चू कडू यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिलीय.

आ. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं नसून सेटलमेंट केल्याचा आरोप राणांनी केला. याला बच्चू कडू यांनी आज सणसणीत उत्तर दिलं. आ. रवी राणा यांनी पैसे घेतल्याचे पुरावे दिले तर त्यांच्या घरी भांडी घासने, असं म्हणत बच्चू कडू यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दिलीय. अमरावतीमध्ये सध्या कडूविरुद्ध राणा असा वाद पेटलेला दिसतोय.

दरम्यान, या दोघांच्या भांडणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार असल्याची माहिती आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी काल याबाबत स्पष्टीकरण दिलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वादाशी भाजपचा संबंध काय, असा प्रश्न उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com