अमरावती हिंसाचार : परिस्थिती नियंत्रणात, पण इंटरनेट सेवा तीन दिवस बंदच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amravati violence

अमरावती हिंसाचार : परिस्थिती नियंत्रणात, पण इंटरनेट सेवा तीन दिवस बंदच

अमरावती : अमरावती बंदला शनिवारी हिंसक वळण (amravati violence) लागल्याने शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कुठल्याही अफवा पसरू नये यासाठी अमरावतीत तीन दिवस इंटरनेट सेवा बंदच ठेवण्यात आली आहे. सध्या अमरावती शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून शहरात शांतता पसरली आहे.

हेही वाचा: अमरावती : जाळपोळ व तोडफोड; फोटोंमध्ये पाहा आजची स्थिती

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावतीत आंदोलन करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी बंद पुकारला होता. त्यावेळी हिंसाचार उफाळून आला. यावेळी राजकमल नगर, नमुना गल्ली, अंबापेठ भागात दुकाने आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. काही पानटपऱ्याही फोडण्यात आल्या. तसेच पाच ते सहा दुकानांना आग लावण्यात आली. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.

अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिस आयुक्तांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच हा हिंसाचार घडवून आणणाऱ्या लोकांना सोडणार नाही, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले. सध्या अमरावती शहरात शांतता पसरली असून नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, आज भाजपकडून पुन्हा एकदा बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

loading image
go to top