
Amruta Fadnavis : "मॅडम चतुर तुमच्या मालकाकडून.." अमृता फडणवीसांनी महिला खासदाराची औकात काढली
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्याचा चौथा दिवस आहे. यावेळी विधानसभेत अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आला. याचा वादा आता पेटला असून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं ट्विट रिट्विट करत थेट त्यांची औकातच काढली.
फडणवीसांनी सभागृहात सांगितलं की, माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक एफआयआर फाईल केला आहे की, तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करुन घेण्याकरीता त्या ठिकाणी प्रयत्न झाला. पहिल्यांदा पैसे ऑफर करण्यात आले. त्यानंतर ब्लॅकमेल करण्यात आले.
दरम्यान आता अमृता फडणवीस यांनी ट्विट करत ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर जोरदार टीका केली. अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, मॅडम चतुर आधी तुम्ही खोटा दावा केला होता की मी AxisBank ला फायदा करून दिला. आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? अर्थात तुमचा विश्वास संपादन केल्यानंतर, जर कोणी तुमच्याकडे पैसे देऊन केसेस बंद करण्यासाठी संपर्क साधला असता तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाकडून मदत केली असती. तीच तुमची औक़ात आहे.
मला माहित आहे की तुमची औक़ात म्हणजे मास्टर्स बदलण्यासह प्रामाणिक आणि स्वतंत्र महिलांना खाली खेचणे. याबाबत चौकशी करण्यास सांगून नाक खुपसायची काय गरज होती का असा सवालही अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला. मी स्वतः चौकशीची मागणी करे जेणेकरून या फसवणुकीमागील खरे चेहऱ्यांसह समोर येतील.
प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, गुन्हेगाराच्या मुलीला प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश मिळतो आणि तिची मुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी ५ वर्षांहून अधिक काळ मैत्री असते. (विधानसभेतील DCM विधानानुसार). बायकोला दागिने, घालायला कपडे (प्रमोशनसाठी) देते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसोबत गाडीत फिरते, असं म्हणत चतुर्वेदी यांनी टोला लगावला होता.