भाजप आणि आरएसएस एकदम पुरोगामी : अमृता फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis Reaction Bandatatya

भाजप आणि आरएसएस एकदम पुरोगामी : अमृता फडणवीस

मुंबई : बंडातात्या कराडकर यांनी राजकीय महिला नेत्यांवर वैयक्तिक टीका केली. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) प्रतिक्रिया दिली आहे. स्त्रियांनी आपल्या देशात खूप भोगलेलं आहे. त्यांच्यावर टीप्पणी करणं चुकीचं वाटतं, असं अमृता म्हणाल्या.

हेही वाचा: पुणेरी विवेकाचे ठेकेदार अमृता फडणवीसांच्या भाषेवर....; हरी नरकेंचा सवाल

''भाजप आणि आरएसएस एकदम पुरोगामी''

बंडातात्या हे आरएसएसचा बोलवता धनी आहे, अशी टीका त्यांच्यावर झाली. त्यावरून देखील अमृता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''भाजप आणि आरएसएस एकदम पुरोगामी आहे. ते स्त्रियांचा मान ठेवतात. आरएसएसच्या मी अगदी जवळ आहे. ते लोक सर्वात जास्त स्त्रियांना सन्मान देतात. तुम्ही हे विसरून जा, की मी देवेंद्र फडणवीसांची बायको आहे. मी सामान्य स्त्री म्हणून बोलत असते,'' असं अमृता म्हणाल्या.

वैयक्तिक टिप्पणी करणं चुकीचं -

कधीही कोणावर वैयक्तिक टिप्पणी करू नये. दोन गोष्टी वेगळ्या ठेवायला. वैयक्तीक टिप्पणी कोणावरही व्हायला नको. महाराष्ट्रात नेहमीच कोणी बोलल्यावर आंदोलन होतात. स्त्रियांच्या बाबतीत नेहमीच बोललं जातं. पण, आपल्याला मानसिकता बदलायची आहे, असंही त्या म्हणाल्या.

''मी सामान्य माणूस म्हणून बोलतेय'' -

मुंबईत किती समस्या आहेत. रस्ते, मेट्रो, एसटी कर्मचाऱ्यांची समस्या. मी सामान्य माणूस, बाई म्हणून बोलली आहे, की तुम्ही समस्यांकडे लक्ष द्या, असे त्या नवाब मलिक आणि नाना पटोले यांच्यावर केलेल्या ट्विटबद्दल म्हणाल्या. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील टीका केली. महावसुली सरकारची कामे जशी सुरू आहेत. याबाबत सर्व जग बोलतंय. त्यांच्यामधील अवगुण आहे ते त्यांनी स्वीकारयला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

बंडातात्या काय म्हणाले? -

नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेली आहेत. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या देखील दारू पितात, असा त्यांनी उल्लेख केला आहे. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारू पित नाही त्याचं नाव सांगा. तसंच आपण नावं घेतली आहेत आणि त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करू शकतो, असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत हे सांगावं, असं खुलं आव्हान देखील त्यांनी दिलं होतं.

Web Title: Amruta Fadnavis Reaction On Bandatatya Says Rss And Bjp Is Progressive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpRSSAmruta Fadnavis