
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसंच महाराष्ट्राचे त्यांनी आभारही मानले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांच्या भाऊ आणि वहिनीवर केलेल्या या प्रेमाचा वर्षावाबद्दल आभारी आहोत, असं अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.