मराठी बोलण्याच्या ओघात...अमृता फडणवीसांनी केली राज्यपालांची पाठराखण; Koshyari Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis News

Koshyari Controversy: मराठी बोलण्याच्या ओघात...अमृता फडणवीसांनी केली राज्यपालांची पाठराखण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. 'मराठी बोलण्याच्या ओघात जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. ' अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. (Amruta Fadnavis took the Governor Bhagat Singh Koshyari side controversy statement )

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळं सध्या राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. अशातच अमृता फडणवीस यांनी बाजू घेतल्याने राज्यात या प्रकरणाला नवं वळणं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

मराठीवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत. मराठी बोलण्याच्या ओघात जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. असे अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.