esakal | अमृता फडणवीस आदित्य ठाकरेंना म्हणाल्या, 'रेशमी' किडा
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis

रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ समजणार नाही. कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो.

अमृता फडणवीस आदित्य ठाकरेंना म्हणाल्या, 'रेशमी' किडा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उद्देशून बांगड्या भरण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विट केल्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंना टोला लगाविला आहे. एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी 100 कोटी नागरिकांवर 15 कोटी भारी असे वक्तव्य केल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका करत तुम्ही बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही घातलेल्या नाहीत, असे म्हटले होते. यावर आदित्य ठाकरेंनी आज ट्विट करत आपण हे वक्तव्य मागे घ्यायला हवे आणि वृत्ती बदलायला हवी असे म्हटले होते. यापूर्वीही शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आता पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, की रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ समजणार नाही. कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो. या ट्विटमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टॅग केले आहे.