Amul Milk: दिवाळीच्या तोंडावर झटका! अमूल दूध दरात प्रतीलिटर 2 रूपयांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

milk

Amul Milk: दिवाळीच्या तोंडावर झटका! अमूल दूध दरात प्रतीलिटर 2 रूपयांनी वाढ

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसणार असून अमूल दूध दरात प्रती लिटर दोन रूपयांची वाढ होणार आहे. डाळ, तेल आणि महत्त्वाच्या वस्तूवरील वाढत्या भावाबरोबरच दुधाचेही भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

(Amul Milk Rate Grow By 2 Rupees)

सध्या अमूलच्या एका लीटर दुधासाठी ६१ रूपये मोजावे लागत होते. त्यानंतर आता एका लिटर दुधासाठी ६३ रूपये मोजावे लागणार आहेत. तर आजपासून अमूलने ही दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिवाळीच्या तोंडावर महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

हेही वाचा: Sextortion: पुण्यात सेक्सस्टॉर्शनचा आणखी एक बळी; दत्तवाडी परिसरातील 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या

दरम्यान, डाळी, तेल आणि महत्त्वाच्या खाद्यपदार्थांच्या भावात नुकतीच वाढ झाल्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे. तर दिवाळी तोंडावर आली असून दुधाचेही भाव वाढल्यामुळे महागाईने ग्राहकांना झळा सहन कराव्या लागणार आहेत.