
'गद्दारांना माफी नाही' सेनेबरोबर गद्दारी करणाऱ्या नगरसेवकाचं काय झालं?
विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांना सोबत नॉट रिचेबल झाले. महाराष्ट्रात सुरू असलेलं नाराजीनाट्य आणि हा सत्तासंघर्ष आणखी तीव्र होत चालले आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद चिंतामणी दिघे यांचे शिष्य असून त्यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव आहे. आताच्या वादातही एकनाथ शिंदे सतत आनंद दिघे यांचा उल्लेख करत असतात. आनंद दिघे हे मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे बाहुबली नेते होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे दिघे यांची तळागाळात जबरदस्त पकड होती. रॉबिनहूड शैलीत जगणाऱ्या दिघे यांचे ठाणे जिल्ह्यात असंख्य चाहते होते. (shiv sena anand dighe)
आनंद दिघे यांच्या आयुष्यावर धर्मवीर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटच्या निमित्ताने आनंद दिघेंच्या आयुष्यातल्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींना उजाळा देण्याचे काम करण्यात आला आहे. त्यात चित्रपटातील एक डायलॉग ‘गद्दारांना माफी नाही’ आनंद दिघेंच्या या डायलॉगची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे. काय आहे या डायलॉगचा अर्थ आणि ठाण्यातल्या एका खून प्रकरणाशी याचा संबंध का जोडला जातो आहे? ते आपण जाणून घेऊ.
ठाणे महानगरपालिका निवडणूक 1989 या निवडणुकीत शिवसेनेचे 30 नगरसेवक निवडून आले होते. त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी बाळासाहेब ठाकरे यांनी माजी महापौर सतीश प्रधान आणि आनंद दिघे यांच्याकडे देण्यात आली होती. शिवसेनेकडून महापौर पदासाठी प्रकाश परांजपे हे उमेदवार होते. पण 30 नगरसेवक असून पण शिवसेनेला त्यांच्या महापौर करता आला नाही. प्रकाश परांजपे यांचा अवघ्या एक मताने पराभव झाला. उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीतसुध्दा शिवसेनेचा पराभव झाला. शिवसेनेच्या या पराभवामुळे बाळासाहेब भडकले. नगरसेवक असतानाही महापौर शिवसेनेचा झाला नाही ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागले. त्यांनी आनंद दिघेना बोलवून घेतले आणि विचारले गद्दार कोण? तेव्हा आनंद दिघे बोले कुणी का असा ना ‘गद्दारांना माफी नाही’.
आनंद दिघेंनी तेव्हाच्या प्रसारमाध्यमांशी बोलताना पण हेच सांगितले की आता गद्दारांना माफी नाही. दिघेंचे हेच वाक्य उचलून दुसऱ्या दिवशी ठाण्यामध्ये ठिकठिकाणी शिवसैनिकांनी पोस्टर लावले 'गद्दारांना माफी नाही'. या घटनेनंतर काहीच दिवसात ठाण्यातले शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या करण्यात आली. हल्ला इतका क्रूर होती की ज्यात खोपकरांचा मृत्यू झाला. त्याच्या हल्लानंतर शिवसेनेचा फुटलेला नगरसेवक खोपकर आहे का? दिघेच्या गद्दारांना माफी नाही या विधानाचा रोख खोपकरांकडे होता का? वगैरे चर्चांना उधाण आलं हे प्रकरण महाराष्ट्रात प्रचंड गाजलं, तत्कालीन सरकारने आणि पोलिसांनी आनंद दिघेंसह 52 नगरसेवकांना अटक पण केले. आनंद दिघे वर टाडा कायदा लावण्यात आला. ठाण्यात यानंतर खूप तणाव निर्माण झाला होता. पुढे आनंद दिघेंच्या मृत्यूपर्यंत ही केस कोर्टात चालू राहिली पण हत्या कोणी केली हे काय सिद्ध झालं नाही.
Web Title: Anand Dighe No Apology To Traitors Shiv Sena Eknath Shinde Uddhav Thackeray Maharashtra Political Crisis Updates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..