गायक आनंद शिंदे यांची राजकारणात एंट्री; थेट प्रदेशाध्यक्षपदी निवड

वृत्तसंस्था
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

आता गायक आनंद शिंदे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेचच त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी पक्ष सोडून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यानंतर आता गायक आनंद शिंदे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेचच त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज संसारे यांनी ही माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघापैकी मोहोळ आणि माळशिरस दोन विधानसभा राखीव मतदारसंघ आहेत. या दोन मतदारसंघापैकी एका मतदारसंघातून आनंद शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

'कोंबडी पळाली' प्रसिद्ध

आनंद शिंदे यांनी 'शिट्टी वाजली', 'कोंबडी पळाली', 'जवा नवीन पोपट हा' यांसारखी हिट गाणी दिली आहेत. यांसारख्या गाण्यांमुळे ते प्रसिद्ध झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anand Shinde enter in politics Becomes State President of MSRP