Andheri East Bypoll Result 2022: ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित, 'नोटा'लाही पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rutuja Latke

Andheri East Bypoll Result 2022: ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित, 'नोटा'लाही पसंती

Mumbai: अंधेरी पूर्व पोटनिडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाच्या नेत्या ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित समजला जात आहे. तिसऱ्या फेरीतही लटके आघाडीवर आहेत.

आठव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके -29033
बाळा नाडार -819
मनोज नाईक - 458
मीना खेडेकर - 789
फरहान सय्यद - 628
मिलिंद कांबळे - 358
राजेश त्रिपाठी - 787
नोटा - 5655

एकूण मतमोजणी  - 38527

सहाव्या फेरीअखेर ऋतुजा लटके यांना २१ हजार ९० मतं मिळालेली आहेत. तर बाला नाडार यांना ६७४ मतं, मनोज नायक यांना ३९८ मतं मिळालीत. महत्त्वाचं म्हणजे नोटाला ४ हजार ३३८ मतं पडलेली आहे.

पाचव्या फेरीअखेर लटकेंना १७ हजार २७८ मतं मिळालीत. तर नोटाला ३ हजार ८५९ मतदारांनी पसंती दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

तिसऱ्या फेरीमध्ये लटके यांना ११ हजार ३६१ मतं मिळाली. तर 'नोटा'च्या पर्यायाला २ हजार ९६७ मतदारांनी पसंती दिल्याचं स्पष्ट झालेलं आहे.

हेही वाचाः भारतीय महिलांचा सुरक्षित गुंतवणुकीकडेच का असतो ओढा?

दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीवरुन नाट्यमय घडामोडी घडल्या. आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात त्यांना उमेदवारी मिळते की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला. शेवटी त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. भाजपने घोषित केलेले उमेदवार मुरजी पटेल यांनाही माघार घ्यावी लागली. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय सोपा झाला आहे. परंतु या निवडणुकीत मुरजी पटेल यांचे समर्थक नाराज झाल्याचे दिसून आले. त्यामुळे 'नोटा'च्या पर्यायाला अनेकांनी पसंती दिल्याचे चित्र आहे.