esakal | प्रेमाचा चहा दहा रुपयाला झाला तर राग येतो; मग पेट्रोल, डिझेल...
sakal

बोलून बातमी शोधा

Anger from netizens over MLA Rohit Pawars Premacha chaha

‘आपण सगळेच चहाचे चाहते आहोत. हा चहा १० रुपयाला झाला म्हणून प्रेमाचा चहा सुद्धा आपल्याला रागाचा वाटतो... मग पेट्रोल व डिझेलच्या किंमती 89 रुपयांवर गेल्याचाही तुम्हाला राग आलाच असेल, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

प्रेमाचा चहा दहा रुपयाला झाला तर राग येतो; मग पेट्रोल, डिझेल...

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : ‘आपण सगळेच चहाचे चाहते आहोत. हा चहा १० रुपयाला झाला म्हणून प्रेमाचा चहा सुद्धा आपल्याला रागाचा वाटतो... मग पेट्रोल व डिझेलच्या किंमती 89 रुपयांवर गेल्याचाही तुम्हाला राग आलाच असेल, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. 
देशात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. आता त्यात शिथीलता आणाली आहे. मात्र, अद्यापही उद्योग व्यवसाय सुरळीत झालेले नाहीत. लॉकडाऊनमुळे अर्थकारणावर खूप मोठा परिणाम झाला आहे. त्यातच नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधून संतपा व्यक्त केला जात आहे. त्यातच आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. आमदार रोहित पवार यांची व 'प्रेमाचा चहा'चे मालक सिद्धार्थ भाडळे, मंगेश तुपे यांची भेट झाली. यांचा फोटो ८ जुलैला त्यांनी ट्विट केला. यावर काहीजणांनी प्रतिक्रीया दिल्या होत्या. त्यावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, ‘आपण सगळेच चहाचे चाहते आहोत. हा चहा १० रुपयाला झाला म्हणून प्रेमाचा चहा सुद्धा आपल्याला रागाचा वाटतो... मग पेट्रोल व डिझेलच्या किंमती 89 रुपयांवर गेल्याचाही तुम्हाला राग आलाच असेल’

.
यावर एकाने म्हटलंय की, दादा कस आहे.. चहा नाही परवडला तर पाण्याचा पिता येतो म्हणून किमती महाग वाटतात. पण गाडीत पेट्रोल ऐवजी पाणी नाही टाकता येत. आणि किमती कमी कराल म्हणून तर मत देत आहोत तुम्हाला. धैर्यशिल पवार यांनी म्हटलंय की, जितका राग पेट्रोल डिझेलच्या किमती बघून येत नाही तितका राग तो पेट्रोल पंपवरचा दात काढून हसत अच्छे दिन दाखवणार चेहरा बघून येतो. एकाने म्हटलंयं की, रोहित दादा पेट्रोलचा 89 रुपये भाव नाहीये 93.28 रुपये आहे. कालच भरलय, आपण कधी भरलात लास्ट टाइम, असा प्रश्‍न केला आहे.
कंकरसिंग राजपुत यांनी म्हटलंयं की, दादा सरळसेवेचे अर्ज फी 4 ते 5 हजार भरली आहे आम्ही. 19 महिने झाले काय करावे आम्ही. भगवान पालवे यांनी म्हटलंय की, राग तर वीजबील आणि आमदारांना गाडीसाठी दिलेल्या पैशाचापण आला करता काय? बहुतेक तुम्ही गाडी घेतली असेल म्हणून पेट्रोल आणि डिझेल बद्दल बोलताय.