Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस धमकी प्रकरणी मोठी बातमी! अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Devendra Fadnavis and Aniksha jaisinghani
Devendra Fadnavis and Aniksha jaisinghani

मुंबई : अमृता फडणवीस धमकी प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. अमृता फडणवीस यांना धमकी प्रकरणात अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अनिक्षा जयसिंघानी वर गृहमंत्री देवेंद्र फडणीसयांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी देणे तसेच त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत. याच प्रकरणात अनिक्षाला अटक देखील करण्यात आली होता. आता या प्रकरणात जयसिंगानीला मुंबई सत्र न्यायालयाने ५० हजारांचा जामीन मंजूर केला आहे. गेल्या सुनावणीत अनिक्षाला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

हेही वाचा - नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Devendra Fadnavis and Aniksha jaisinghani
Pune News : पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली ३ कोटींची खंडणी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान कोठडी सुनावल्यानंतर लगेच जयसिंघानी यांनी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी अमृता फडणवीस यांच्या संपर्कात असल्या तरी अनिक्षा जयसिंघानी यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नव्हता. त्यांचे संबंध कायम चांगले होते. कुठल्यातरी राजकीय हेतूने अनिक्षा यांना या प्रकरणात गोवण्याच प्रयत्न होत असल्याचा युक्तीवाद अनिक्षांच्या वकिलानी कोर्टात केला. चौकशी पुर्ण झाली आहे आणि या प्रकरणात दिली जाणारी जास्तीत जास्त शिक्षा देखील जामीनास पात्र आहे. त्यामुळे अनिक्षा ही विधी शाखेची विद्यार्थीनी आहे तिला जामीन मिळावा असे अनेक युक्तीवाद करण्यात आले होते.

Devendra Fadnavis and Aniksha jaisinghani
Latur Accident News : औसा-निलंगा मार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार

हेच युक्तीवाद ग्राह्य धरत कोर्टाने अनिक्षा जयसिंघानी यांना ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. तात्काळ जामीन मंजूर करण्यात आला, तिचा पासपोर्ट जमा करण्याचे आदेश तसेच तपासात सहकार्य करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच तपास अधिकारी जेव्हा-जेव्हा चौकशीसाठी अधिकारी बोलवतील तेव्हा अनिक्षाला मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये हजर राहावे लागेल अशी अट मुंबई सत्र न्यायालयाने घातली आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com