
‘मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत एकच नेता; तो म्हणजे देवेंद्र फडणवीस’
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. हा महाविकास आघाडीसाठी मोठा झटका आहे. विशेष शिवसेनेसाठी. कारण, भाजपच्या हट्टीपणामुळे सहाव्या जागेसाठी वाद होत असल्याचे शिवसेनेतर्फे बोलले जात होते. आजच्या विजयावरून मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत एकच नेता असल्याचे दिसून येते. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), असे भाजपचे विजयी उमेदवार अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले. (Anil Bonde said, only one leader from Mumbai to Gadchiroli; He is Devendra Fadnavis)
महाविकास आघाडीला अजून धक्के सहन करावे लागणार आहे. समोर राष्ट्रपतीपदाची निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारने तयार असावे. आपसातील कलहामुळे हे सरकार पडेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तेव्हा कोणीही मुहूर्त सांगू नये. तसेच घाई करण्याची गरज नाही, असेही अनिल बोंडे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
हेही वाचा: नोकरी सोडण्यात भारतीय आघाडीवर; ८६ टक्के कर्मचारी देऊ शकतात राजीनामा
परिपक्व माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. माणसे कशी जोडली जातात यांची त्यांना पूर्ण माहिती आहे. त्यांनी अपक्ष आमदारांना आपले केले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्तुती केली. त्यांच्या गुणाची विरोधकांनी चांगली माहिती आहे. यामुळेच त्यांचा विरोध केला जातो, असेही अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले.
आवाहनाला अपक्ष आमदारांनी साथ दिली
मुख्यमंत्री अपक्ष आमदारांना कधीच भेटत नाही. कामासाठी कमिशन मागितले जाते, असे त्यांचेच नेते सांगतात. यामुळे विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला अपक्ष आमदारांनी साथ दिली. भाजपवर टिका करणारे संजय राऊत तिसऱ्या स्थानावर विजयी झाले. त्यांच्या शेवटचा नंबर आला, असेही अनिल बोंडे म्हणाले.
Web Title: Anil Bonde Said Only One Leader From Mumbai To Gadchiroli He Is Devendra Fadnavis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..