Anil Deshmukh : जामीन मिळूनही अनिल देशमुख कोठडीतच; CBI ने १० दिवस थांबवलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh Kundan Shinde bail application court
Anil Deshmukh : जामीन मिळूनही अनिल देशमुख कोठडीतच; CBI ने १० दिवस थांबवलं!

Anil Deshmukh : जामीन मिळूनही अनिल देशमुख कोठडीतच; CBI ने १० दिवस थांबवलं!

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र तरीही अनिल देशमुख कोठडीतच राहणार आहेत. सीबीआयच्या मागणीमुळे अजून १० दिवस तरी अनिल देशमुखांची सुटका होणार नाही.

हेही वाचा: Anil Deshmukh : अटीशर्तीसह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात जामीन मंजूर

याचं कारण म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन दिल्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान दिलं आहे. सीबीआय आता या विषयी पुढे दाद मागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी आता १० दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. जामीनाचा आदेश स्थगित करावा, अशी मागणी सीबीआयने केल्याची माहिती देशमुखांचे वकील अनिकेत कदम यांनी दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना १ लाख रुपयांच्या बॉन्डसह जामीन दिला आहे. अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी सीबीआय आणि त्यानंतर ईडीच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीचा आरोपही करण्यात आला होता. गेल्या महिन्यांत उच्च न्यायालयाने त्यांना ईडीच्या गुन्ह्यातून जामीन दिला होता.