esakal | "स्वतःला वाचवण्याची परमबीर सिंग यांची धडपड"; अनिल देशमुखांनी फेटाळले आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh_parambir singh

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले आहे.

"स्वतःला वाचवण्याची परमबीर सिंग यांची धडपड"; अनिल देशमुखांनी फेटाळले आरोप

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले आहे. दरम्यान, आपल्यावरील हे आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळले आहेत. यासंदर्भात देशमुख यांनी ट्विट केलं असून परमबीर सिंग यांच्यावर टीकात्मक भाष्य केलं आहे. 

गृहमंत्री देशमुख म्हणाले, "परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून बचावासाठी माझ्यावर हा खोटा आरोप केला आहे. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना त्यांनी हे आरोप केले आहेत."

परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटलं की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना त्यांच्या बंगल्यावर बोलावून मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्समधून महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितलं होतं. मुंबईत साधारण १,७५० बार आणि रेस्टॉरंट्स आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणाहून २ ते ३ लाख रुपये वसूल केले तरी महिन्याकाठी ४० ते ५० लाखांचं टार्गेट सहज शक्य आहे, असंही देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितलं होतं. यानंतर वाझे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सर्व प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून मी देखील शॉक झालो, असंही परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे.

loading image
go to top