Anil Deshmukh : अनिल देशमुख कारागृहामध्ये चक्कर येऊन पडले; जेजे रुग्णालयात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh suddenly fainted in arthur road jail today admitted in J J Hospital mumbai

अनिल देशमुख कारागृहामध्ये चक्कर येऊन पडले; जेजे रुग्णालयात दाखल

मुंबई : अनिल देशमुख आज अर्थर रोड कारागृहामध्ये अचानक चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्याने व त्रास जास्त असल्याने त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब वाढला आहे व ईसीजी दोष आढळला असून तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांची तपासणी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी असाच त्रास होत असल्याने त्यांना सुरुवातीला जेजे रुग्णालयात व नंतर KEM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

अनिल देशमुख हे सध्या अर्थर रोड तुरुंगात आहेत, ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयिन कोठडीत ठेवण्यात आले आहे. कारागृहातच चक्कर येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार आज सकाळी अकरा वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थर रोडचे अधिकारी आणि वैद्यकिय आधिकाऱ्यांनी त्यांती तपासणी केली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्यांचा रक्तदाब जास्त असल्याचे समोर आले. त्यामुळे दोन ते तीन दिवस त्यांना अजून जेजे रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. दोन महिन्यापूर्वी देखील त्यांची अशीच तब्यत बिघडली होती.

हेही वाचा: जर 'विक्रम वेधा' हिट झाला तर मी....KRK नं दिलं हृतिकला खुलं आव्हान

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह तसेच पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितले असल्याचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली आणि अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. सध्या ते अर्थर रोड कारागृहात न्यायालयिन कोठडीत आहेत.

Web Title: Anil Deshmukh Suddenly Fainted In Arthur Road Jail Today Admitted In J J Hospital Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Anil deshmukh