Anil Deshmukh: जामीन फेटाळल्यानंतर देशमुखांची हायकोर्टात धाव; 'या' तारखेला सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

Anil Deshmukh: जामीन फेटाळल्यानंतर देशमुखांची हायकोर्टात धाव; 'या' तारखेला सुनावणी

मुंबईः गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामिनासाठी आता हायकोर्टात धाव घेतली आहे. सीबीआय कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर आता ११ नोव्हेंबर रोजी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

(Former Maharashtra minister Anil Deshmukh)

अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाई प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांतही जामीन मिळविण्यासाठी देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज केला होता. या जामीन अर्जावरील देशमुख आणि सीबीआयचा युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयात देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

या निर्णयाविरोधात अनिल देशमुख यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. सीबीआय केसमध्ये जामीन मिळावा, अशी त्यांनी मागणी केलीय. ईडीच्या केसमधील मिळालेल्या जामिनाच्या आधारावर हा जामीन मिळावा, असं म्हटलं आहे. या प्रकरणी आता ११ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

तसेच ९ नोव्हेंबरपर्यंत सीबीआयला अनिल देशमुखांच्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

टॅग्स :NCPCBIEDanil deshmukh