फडणवीस सरकारला दाऊद संबंधित कंपनीकडून देणगी? अनिल गोटेंची ED कडे तक्रार

Anil Gote Allegations Devendra Fadnavis
Anil Gote Allegations Devendra Fadnavise sakal

मुंबई : महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली. ईडीने नुकतीच नवाब मलिकांना (Nawab Malik) अटक केली. त्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. संजय राऊतांनी देखील काही पुराव्यांसह पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. आता राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे (Anil Gote) यांनी तत्कालीन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारला दाऊद संबंधित कंपनीकडून देणगी मिळाल्याचा आरोप केला आहे.

Anil Gote Allegations Devendra Fadnavis
आम्ही राज्यपालांचं भाषण का ऐकावं? - देवेंद्र फडणवीस

अनिल गोटेंचे आरोप काय? -

''कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला देशद्रोही व 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी इक्बाल मिरची आहे. त्याच्या संबंधित असलेल्या RKW Developers Pvt Ltd चे मालक राकेश वाधवान यांच्या बँक खात्यातून फडणवीस सरकारला २०१४ ते १५ मध्ये १० कोटी रुपये देणगी देण्यात आली होती. राकेश वाधवान पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून सध्या तुरुंगात आहे'', असे आरोप अनिल गोटे यांनी केले आहे. खंडणी गोळा केल्याप्रकरणी अनिल गोटे यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात तक्रार नोंदवल्याची माहिती आहे. याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच देवेंद्र फडणवीसांची चौकशी करण्याची मागणी गोटेंनी केली आहे.

तपास यंत्रणांच्या कारवाईवरून वातावरण तापलंय -

गेल्या अनेक दिवसांपासून तपास यंत्रणांकडून राज्यातील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची इन्कम टॅक्सकडून चौकशी करण्यात आली. संजय राऊतांच्या कुटुंबीयांवर ईडीने छापेमारी केली. शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. हे सर्व होत नाहीतर काही दिवसांपूर्वी मंत्री नवाब मलिकांना ईडीने अटक केली. सध्या ते ईडी कोठडीत आहेत. त्यानंतर राज्यातील वातावरण तापलं असून भाजप सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप होत आहे. तसेच संजय राऊतांनी भाजपविरोधात पंतप्रधान कार्यालय आणि ईडीला पुरावे दिल्याचे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com