एसटी कर्मचारी कामावर हजर न झाल्यास सदावर्ते जबाबदार - अनिल परब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab
एसटी कर्मचारी कामावर हजर न झाल्यास सदावर्ते जबाबदार - अनिल परब

एसटी कर्मचारी कामावर हजर न झाल्यास सदावर्ते जबाबदार - अनिल परब

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर हायकोर्टानं अंतिम आदेश दिल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच जे कर्मचारी वकील गुणरत्न सदावर्ते यांचं ऐकून कामावर हजर होणार नाहीत, त्यांच्यावरील कारवाईला सदावर्ते जबाबदार असतील, असा इशाराही परब यांनी दिला. (Anil Parab is always responsible if ST employee does not come up for work)

परब म्हणाले, "आता हे एसटी कर्मचाऱ्यांनी ठरवायचं आहे की, आपण कोणाच्या विचारांनी चालायचं आहे. गेले पाच महिने जे नुकसानं झालं आहे, कामगारांना पगार मिळालेला नाही. त्यांचे हे पगार आता भरुन कोण देणार? आज त्यांची आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे. तरी देखील कर्मचाऱ्यांनी जर सदावर्तेंचं ऐकून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला तर हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल आणि त्याच्या नुकसानीची जबाबदारी ही वकील गुणरत्न सदावर्ते यांची असेल"

...तर २२ एप्रिलनंतर काय होणार कारवाई?

२२ एप्रिलनंतर जर कोणी कामावर रुजू झालं नाही तर आम्ही असं समजू की या कर्मचाऱ्यांना नोकरीची गरज नाही. त्यामुळं आम्ही यापूर्वी जशी कारवाई केली होती जसं की, जे कर्मचारी कामावर आले नव्हते त्यांना आम्ही आधी निलंबित करत होतो त्यानंतर बडतर्फ करत होतो आणि सेवा समाप्त करत होतो. त्यामुळं यापुढं कोर्टानं निर्देश दिले नाहीत तर ही कारवाई २२ तारखेनंतर अशीच चालू राहिलं, असा इशाराही यावेळी अनिल परब यांनी दिला आहे.

Web Title: Anil Parab Is Always Responsible If St Employee Does Not Come Up For Work

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top