Anil Parab: अनिल परब यांच्या रिसॉर्टवर लवकरच बुलडोझर, पर्यावरण विभागाने मागवल्या निविदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab: अनिल परब यांच्या रिसॉर्टवर लवकरच बुलडोझर, पर्यावरण विभागाने मागवल्या निविदा

Anil Parab: अनिल परब यांच्या रिसॉर्टवर लवकरच बुलडोझर, पर्यावरण विभागाने मागवल्या निविदा

शिवसेना नेते माजी परीवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टवर लवकरच कारवाई होणार असं ट्विट काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं होत. आज या दोन याचिकांवर सुनावणी होण्याची शक्यताही आहे. अशातच पर्यावरण विभागाकडून बांधकामातील अनियमितते प्रकरणी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदेमद्धे येत्या 22 सप्टेंबरपर्यंत रिसॉर्ट पाडण्यासाठी कंत्राटदारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांपासून अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट प्रकरण लावून धरलेलं होतं. त्यावरती अखेर पर्यावरण मंत्रालयाकडून कारवाई करण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना नेते माजी परीवहन मंत्री अनिल परब यांनी 2017 मध्ये दापोली जवळ जमीन विकत घेतली होती, मात्र त्याचं रजिस्ट्रेशन दोन वर्षानंतर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ही शेतजमीन असून सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने ती नॉन अग्रीकल्चर करण्यात आलं असल्याच म्हटलं जात आहे. रिसॉर्टचे बांधकाम करताना CRZ नियमांचं उल्लंघन केल्याचाही आरोप अनिल परब यांच्यावर करण्यात आला आहे. मुरूड ग्रामपंचायतीने ही गोष्ट मान्य केली आहे, असा दावा पर्यावरण मंत्रालयाने केला आहे.

Web Title: Anil Parabs Resort At Dapoli Tender Issued By Public Works Department For Demolition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kirit SomaiyaAnil parab