
Anjali Damania: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा कृषी घोटाळा आणि 'ऑफिस ऑफ प्रॉफीट' प्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) तपासणी अधिकाऱ्यांना दिल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. पुढच्या बुधवारी पुन्हा एकदा स्टेटमेंट देण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.