
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज (बुधवार) बारामती बंदचे आवाहन करण्यात आले आहे. याविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत चोर तो चोर वर शिरजोर असे म्हटले आहे.
दमानिया यांनी म्हटले आहे, की शरद पवार यांच्या समर्थकांकडून बारामती बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हे दुर्दैवी आहे. चोर तो चोर वर शिरजोर असा हा प्रकार आहे. बारामती कायमची बंद केली तरी काही फरक पडत नाही. यावरून असे दिसतेय की तुम्ही फक्त बारामतीपुरते मर्यादित आहात. खरंच आनंद होतोय.. एक राक्षस दुसऱ्या राक्षसाला मारतांना बघून... दुसरा ठार होणार की नाही हे मात्र काळच सांगेल. नाहीतर निवडणूक झाली की सगळं थंड. शब्दशः घेऊ नये, भावार्थ समजून घ्यावा.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपल्या ताब्यात घेतले असून, 'मनी लॉंडरिंग' प्रतिबंधक कायद्याखाली या प्रकरणाची नोंद केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नावाचा समावेश आहे. 'ईडी'च्या वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा यात समावेश नसला, तरी त्यासंदर्भातील पुष्टीच्या कागदपत्रांमध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे आणि इतरही अनेक राजकीय नेत्यांची नावे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.