उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी दिले हे उत्तर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

उदयनराजे भाजपमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईन, त्यांच्या प्रवेशावर चर्चा सुरू आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आज स्पष्ट केले.

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. उदयनराजे भाजपमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईन, त्यांच्या प्रवेशावर चर्चा सुरू आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आज येथे स्पष्ट केले.

दरम्यान, भाजप-सेना युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. भाजपच्या आमदारांची संख्या सध्या 132 (पक्षात प्रवेश केलेले धरून) आहे. "सीटिंग' कायम ठेवण्यात येणार असल्याने जागा अदलाबदलाची शक्‍यता फारच कमी आहे, त्यास एखादा अपवाद राहू शकतो. दोघांचा वैचारिक अजेंडा एकच आहे, त्यामुळे युती होणारच आहे.

शिवसेनेलाही त्यांच्या जागा आणि क्षमतेची जाणीव असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या विषयाला दोन सप्टेंबरनंतर गती मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. सध्या बऱ्याच गणेश मंडळांचे पदाधिकारी प्रशासनाच्या कुरबुरी करताना दिसतात. प्रशासनातले अधिकारी जनतेला त्रास द्यायला बसलेले नाहीत, तर त्यांच्या सुविधेसाठी आहेत, ही बाब सर्वांनी ध्यानात ठेवायला हवी, असेही पाटील यांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Answer by Chandrakant Patil on BJP's entry into Udayan Raje bhosle