
प्रश्न : शेती व्यवसाय करण्यात समाधानी नाही, असे ७० टक्के लोकांनी सांगितले आहे.
उत्तर : हवामान बदल, पर्जन्यमानातील अनिश्चितता, शेतमजूर टंचाई, वाढता उत्पादनखर्च आणि बाजार भावातील अस्थिरता यासारख्या अनेक समस्यांमुळे शेतकरी शेती व्यवसायाबद्दल असमाधानी आहेत. परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. शेती तंत्रज्ञान, जलसंधारण योजना, प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, पीएमएफएमई, पीओसीआरए. स्मार्ट यांसारख्या योजना सुरु आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी डिजिटल डेटाबेस तयार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना (ॲग्रीस्टॅक) सुरु करण्यात आली आहेत. या माध्यमांतून योजना आणि कर्ज यांची सहज उपलब्धता, बाजारपेठेतील नवीन संधी आणि थेट विक्रीचा लाभ, तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्ट शेती करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.