Apple Store In Mumbai : अँपलचे देशातील पहिले स्टोर मुंबईत उघडणार

अत्याधुनिक स्टोअरची मजा अनूभवता येणार
apple store in mumbai delhi on 18 april bkc reliance jio world
apple store in mumbai delhi on 18 april bkc reliance jio world

मुंबई : अँपल कंपनी भारतातील आपले पहिले अधिकृत अॅपल स्टोअर १८ एप्रिलला मुंबईत सुरु करणार आहे. बीकेसीमधील रिलायंन्स जिओ वर्ल्डमध्ये अॅपल स्टोअर सुरु होईल. तर दुसरे एपल स्टोर २० एप्रिल रोजी दिल्लीच्या साकेत भागात उघडणार आहे. अॅपल कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली आहे.

या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अॅपलचे सिईओ टिम कूक उपस्थित राहण्याची चर्चा आहे. मात्र कंपनीच्या प्रवक्त्यांनी याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे ‘सकाळ’ सोबत बोलताना सांगीतले.दुसरीकडे अॅपल स्टोअर उघडण्याच्या बातमीमुळे मुंबईतील मोबाईल विक्रेते आणि रिटेलर्समध्ये धडधड सुरु झाली आहे.

देशात अधिकृत अॅपल स्टोअर नसताना कंपनी आपले उत्पादन अॅपल प्रिमीयम रिसेलर स्टोअर, रिलायंस डिजिटल, क्रोमा किवा इतर ब्रँडच्या रिटेल स्टोअरमधून विक्रीसाठी उपलब्ध होते. शिवाय ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन स्मार्टफोन विक्री करत होते. मात्र एवढ्या वर्षानंतर कंपनीने आपले अधिकृत अॅपल स्टोअर उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

अॅपल स्टोअर सुरु करण्यासाठी त्या देशात अॅपल उत्पादने निर्मीती होणे आवश्यक असते. उत्पादनाची प्रक्रीया आता सुरु होत असल्यामुळे कंपनीने स्टोअर उघडण्यास एवढा वेळ घेतल्याचे जाणकारांनी सांगीतले.

देशातील पहिले अॅपल स्टोअर उघ़डण्याचा उस्तव साजरा करण्यासाठी कंपनीने अॅपल सिरीज मुंबई रायझिगमध्ये पहिल्या दिवसापासून ते उन्हाळ्यापर्यंत विषेश टुडेची घोषणा केली आहे. या अंतर्गत मुंबईतील स्थानिक नागरिक, मुंबईच्या संस्कृतीचा उस्तव साजरा होणार आहे. अभ्यागतांना, स्थानिक कलावंत आणि क्रिएटिव्हना एकत्र आणून, अॅपलच्या सर्व उत्पादन आणि सेवेची माहिती देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सकाळला सांगीतले.

अँपलचा बाजारपेठ

सायबर मिडिया रिसर्च नुसार अॅपलचा भारतीय मोबाईल बाजारातील वाटा ४ टक्के एवढा आहे.२०२२ या वर्षात अॅपल स्मार्टफोनच्या आयातीत १७ टक्के वाढ झाली आहे. २०२२ मध्ये ६ अब्ज डॉलर किंमतीचे अॅपल उत्पादनांचा भारतात खप झाला. त्यामध्ये ७९ टक्के स्मार्टफोन हे ५० हजार ते १ लाख या किंमतीचे होते.

ऑफलाईन रिटेल हा महत्वाचा टप्पा असून, बहुसंख्य भारतीय ग्राहक उत्पादन खरेदीचा विचार करण्यापुर्वी त्या उत्पादनांना समजून घेणे, स्पर्श करणे, एक्पोर करणे आवडते. अॅपल स्टोरची सेवा ही जागतिक दर्जाची असून, हे स्टोअर भारतीय बाजारपेठेत अॅपल उत्पादनाचे मार्केट वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे.

महत्वाचे म्हणजे या स्टोअरमध्ये एकाच छताखाली अॅपल उत्पादनांची एकोसिस्टिम,सुटे भाग मिळणार आहे. भारतीय ग्राहक या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्टोअरमध्ये वस्तु विकत न घेता, तो भन्नाट अनूभव घेऊ शकतील, असं या क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे.

अँपल स्टोअर उघडल्यामुळे ग्राहकांना कपनीकडून थेट ऑफर मिळेल. त्यामुळे ग्राहक तिकडे जातील.आमच्याकडून अँपल खरेदी करण्याऱ्याची संख्या कमी होण्याची भिती आहे. शिवाय अॅपल स्टोअरच्या आजूबाजूला काही भागापर्यंत दुसऱ्या कंपनीला मोबाईल दुकान उघडता येत नाही.सर्व मोबाईल विक्री करणारे व्यापारी एकत्र येवून अॅपल स्टोअरला विरोध करण्याचा आमचा विचार सुरु आहे.

- रमेश पुरोहीत ,मोबाईल विक्रेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com