सोलापूर शहर गुन्हे शाखेने पकडले! ४० दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; हेल्मेट घेऊन बसने यायचा अन्‌ ‘सीसीटीव्ही’ चुकवून व्हायचा पसार, सासुरवाडी, मित्राकडे गेल्यावरही चोरी

चार वर्षांत सोलापूर, धाराशिव व सातारा जिल्ह्यांतून ४० दुचाकी चोरणाऱ्या पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथील चोरट्याला सोलापूर शहर गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वसंत विहार येथून त्याने एक दुचाकी (एमएच १३, डीके ५५११) चोरली होती. त्या गुन्ह्याच्या तपासात तो सापडला आणि गेल्या सहा महिन्यांत त्याने १३ दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली. सत्यवान रामहरी भोसले (वय ३२) असे त्या चोरट्याचे नाव आहे.
solapur city

solapur city

sakal

Updated on

सोलापूर : चार वर्षांत सोलापूर, धाराशिव व सातारा जिल्ह्यांतून ४० दुचाकी चोरणाऱ्या पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथील चोरट्याला सोलापूर शहर गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वसंत विहार येथून त्याने एक दुचाकी (एमएच १३, डीके ५५११) चोरली होती. त्या गुन्ह्याच्या तपासात तो सापडला आणि गेल्या सहा महिन्यांत त्याने १३ दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली. सत्यवान रामहरी भोसले (वय ३२) असे त्या चोरट्याचे नाव आहे.

सोलापूर शहरात सतत होत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी शहर गुन्हे शाखेचे पथक मैदानात उतरले. ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरीला गेल्या होत्या, त्या घटनांचा तांत्रिक अभ्यास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला. त्यावेळी एक तरुण हेल्मेट हातात घेऊन पायी येत असल्याचे आणि चोरीनंतर दुचाकीवरून निघून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. हैदराबाद रोडवरील बाजार समितीजवळ तो दुचाकीसह थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर श्री. खेडकर यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने १३ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

तो एसटी बसने हेल्मेट हातात घेऊन यायचा. सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणांवरील दुचाकी चोरून हेल्मेट घालून पसार व्हायचा, अशी बाब तपासात समोर आली. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वातील हवालदार विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, विजयकुमार वाळके, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश शिंदे, युवराज गायकवाड, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलिसांकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांच्या पथकाने पार पाडली.

सासुरवाडी, मित्राकडे गेल्यावरही चोरी

सत्यवान भोसले याची सासुरवाडी उमरगा येथे आहे. तो सध्या स्वतःच्या गावी कमी आणि सासुरवाडीत अधिक राहत होता. त्याने उमरगा येथून चार, तर नळदुर्ग येथून दोन दुचाकी चोरल्या. तसेच, म्हसवड येथे कारागृहात ओळख झालेल्या मित्राला भेटून परतताना त्याने तेथूनही एक दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. घरी शेती असून एकुलता एक मुलगा असतानाही तो दुचाकी चोरी करून त्या स्वस्तात विकायचा किंवा दुचाकी तारण ठेवून हातउसने पैसे घ्यायचा. त्या पैशांतून महागडे कपडे, गॉगल आणि बूट खरेदी करून टापटीप राहत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur city police
solapur city police
Solapur city police
Solapur city police
Marathi News Esakal
www.esakal.com