नागपुरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालाच्या उद्‌घाटनाचा मार्ग मोकळा; केंद्राची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

द्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला केंद्रीय वन्यजीव प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उद्‌घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

नागपूर : उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला केंद्रीय वन्यजीव प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उद्‌घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या पाच सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचा श्रीगणेशा करण्यात येणार असल्याचे समजते. 

गोरेवाडा प्राणीसंग्रहलायतील इंडियन सफारी 112 हेक्‍टरमध्ये विकसित करण्यात येत आहे. बिबट आणि अस्वल सफारीच्या काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात पर्यटकांसाठी बिबट व अस्वल सफारी तसेच वाघ आणि तृनभक्षक सफारी सुरू करण्याचे निश्‍चित केले आहे. 

पहिल्या टप्प्यातील दोनच सफारीचे लोकार्पण करण्यावर भर दिला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी उद्‌घाटनाचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात होता. मात्र केंद्रीय वन्यजीव प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी अद्याप नव्हती. ती आता मिळाल्याने सर्व अडथळे दूर झाले आहेत. 

गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील सफारीची सुविधा सुमारे 564 हेक्‍टर क्षेत्रात होणार आहे. यात इंडियन सफारी, अफ्रिकन सफारी, बायोपार्क, नाईट सफारी आणि बर्ड पार्क विकसीत करण्यात येणार आहे.

एफडीसीएम एस्सेल वर्ल्ड गोरेवाडा झू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. हा प्रकल्प 452 कोटीचा आहे. त्यातील 200 कोटीचा वाटा राज्य सरकारचा तर उर्वरीत 252 कोटीचा वाटा एस्सेल वर्ल्डचा राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: approval of the new Gorewada International Zoo in Nagpur