Arvind Sawant| 'हे कसले राम, हे तर हराम!' अरविंद सावंतांचा भाजपवर हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Sawant

'हे कसले राम, हे तर हराम!' अरविंद सावंतांचा भाजपवर हल्लाबोल

राज्यातील सत्ता पलटानंतर राजकीय गोटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. तर राजकीय नेत्यांमध्ये ट्विटर वॉरदेखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजपचे युवा आमदार राम सातपुते यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचले असता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ट्विट करत हे कसले राम हे तर हराम!, असं म्हणत भाजपवर जहरी टीका केली आहे.(Arvind Sawant On BJP Devendra Fadnavis Malshiras MLA Ram Satpute)

भाजपचे युवा आमदार राम सातपुते यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना डिवचले. आधी फाटलेल्या चड्डीला ठिगळं लावा, उगाच आभाळ हेपलायचे धंदे बंद करा, असं ट्विट राम यांनी केलं होतं. त्यांनी हे ट्विट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं होतं. त्यावर अरविंद सावंत यांनी सातपुते यांच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत पलटवार केला आहे.

“कोण हे राम ! सातपुते.. भाजपचे सदस्य का? काय त्यांची भाषा, हेच का भाजपचे हिंदुत्वाचे संस्कार! आदरणीयचा असा घोर अपमान करणारे राज्यकर्ते भाजपचे अलंकारात. हे कसले राम, हे तर हराम. त्यांच्यावर शोध करून शोधणे आहेत देवेंद्र फडणवीसजी रामराज्याची भाषा करू नका”, असे ट्विट अरविंद सावंत यांनी केलं आहे.

हिंदुत्व, राम, अयोध्या, रामराज्य यासारख्या मुद्द्यांवर भाजप आक्रमकपणे आपली भूमिका मांडतं. अयोध्येत रामाचं मंदीर होणं हे भाजपच्या राजकीय वाटचालीतील महत्वाचा टप्पा होता. पण आता ‘रामा’च्या मुद्द्यावरूनच भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Web Title: Arvind Sawant On Bjp Devendra Fadnavis Malshiras Mla Ram Satpute

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpShiv Senaarvind sawant