"ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा कदमांनी शुभेच्छाही दिल्या नाहीत" | Arvind Sawant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Sawant, ramdas kadam

"ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा कदमांनी शुभेच्छाही दिल्या नाहीत"

मुंबई : माजी नेते रामदास कदम यांनी आज माध्यमांना बोलताना ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्याची संध्याकाळ अशी होईल असं वाटलं नव्हतं. पक्षातून अशा प्रकारे आपली हकालपट्टी केली जाईल असंही वाटलं नव्हतं अशी टीका त्यांनी शिवसनेवर करत अजूनही मी शिवसेना जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. रामदास कदम यांच्या टीकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

(Shivsena MP Arvind Sawant On Ramdas Kadam)

हेही वाचा: शिवसेनेची अस्तित्वाची लढाई; कोर्टाच्या निकालाआधी खैरेंकडून यज्ञाचं आयोजन

"उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली तेव्हा रामदास कदमांनी शुभेच्छाही दिल्या नाहीत. आणि ते सांगतात की मी शिवसेनेशी बेईमानी केली नाही. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबत आहे असं म्हणणाऱ्या कदमांनी मातोश्रीवर पाऊलदेखील ठेवलं नाही. एवढी कुपमंडूक विचारांची माणसं आहेत ही, स्वयंकेंद्री माणसं आहेत." असं म्हणत अरविंद सावंत यांनी कदमांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला काय कमी केलं आहे हे त्यांनी समोर येऊन सांगावं, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही त्यांचं पुनर्वसन केलं तरी ते शिवसेनेवर आरोप करत आहेत असं सावंत म्हणाले.

रामदास कदम यांना फक्त सत्ता पाहिजे. जर तुम्हाला राष्ट्रवादीची अडचण होती तर तुम्ही २०१९ला का नाही सांगितलं की राष्ट्रवादीसोबत जायचं नाही? असं म्हणत त्यांनी कदमांवर टीका केली आहे. ज्यांनी तुम्हाला एवढं मोठं केलं त्यांना सोडून तुम्ही जाता त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. उद्धव ठाकरे आजारी असताना तुम्ही त्यांना दगा दिला पण आम्ही जगलो तरी शिवसेनेसाठी आणि मेलो तरी शिवसेनेसाठी असं काम करत आहोत असं सावंत म्हणाले.

Web Title: Arvind Sawat On Ramdas Kadam Shivsena Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..