'वानखेडेंनी मुंबईला पाताळलोक केलं, ड्रग्जच्या नावावर हजारो कोटींची वसुली'

Nawab-Malik
Nawab-Maliksakal media
Summary

आर्यन खान हा स्वत:हून तिकिट काढून क्रूजवर गेला नव्हता. त्याचे अपहरण करण्यात आले आणि खंडणी उकळण्यासाठी हे करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत नवे गौप्यस्फोट केले. त्याआधी त्यांनी ट्विटरवरून सॅम डिसूझाचे खरे नाव वेगळेच असल्याचं सांगत त्याचे आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंग यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप शेअर केली होती. २ ऑक्टोबरला एनसीबीने कारवाई केली. ३ तारखेला यामध्ये आर्यन खान असल्याचं समोर आलं. दरम्यान, ही कारवाई फेक असल्याचं आम्ही म्हटलं होतं. याप्रकऱणी दोघंजण आर्यन खानला नेत असलेले व्हिडिओ जारी केले होते असं नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

हाय प्रोफाइल संशयित आरोपीला एनसीबीच्या मुख्यालयात घेऊन जाणारे ते दोघे कोण असा प्रश्न तेव्हा विचारला होता असंही मलिक म्हणाले. तेव्हा एनसीबीने ते पंच असल्याचं उत्तर दिलं होतं. त्यानंतर आणखी एक खुलासा केला होता की, ८ ते १० लोकांना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं. एक वरिष्ठ अधिकारी खात्रीने का सांगू शकत नाही की नेमकं किती लोकांना अटक केली आणि ताब्यात घेतलं असा सवालही मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. सुरुवातीपासून अनेक खुलासे केल्याचं सांगत मलिक यांनी आतापर्यंत काय घडलं तेसुद्धा सांगितले.

समीर वानखेडेंनी सुरुवातीला नेमकी माहिती दिली नाही. नंतर ११ नाही तर १४ लोकांना ताब्यात घेतलं होतं. पुन्हा लोकांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली. तेव्हा सोडण्यात आलेल्या लोकांची नावे सांगा असं आम्ही विचारलं पण ते सांगितलं नाही. त्या तीन लोकांना सोडण्यातच खरी गेम आहे.

मोहित कंबोजला भाजपचा पदाधिकारी केला. दीड वर्षापूर्वी सीबीआय़ने त्याच्या घरावर छापा टाकला. गेल्या महिन्याभरापासून ही व्यक्ती पूर्णपणे बिथरली आहे. न्यायालयाच्या कामकाजातही ही गोष्ट आली की, आर्यन खान हा स्वत:हून तिकिट काढून गेला नाही. तर त्याला प्रतिक गाबा आणि अमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून गेला. हे पूर्ण प्रकरण अपहरण आणि खंडणीचं आहे. मोहित कंबोजच्या भाच्याच्या मदतीने हे सगळं जाळं पसरवण्यात आलं. यात १८ कोटींचे डील झाले पण एका सेल्फीने सगळा खेळ बिघडला असंही मलिक म्हणाले.

अपहरणाचा मास्टरमाइंड हा मोहित कंबोज आहे. मोहित कंबोज आणि वानखेडेचे चांगले संबंध आहेत. शहरात त्याची १२ हॉटेल्स आहेत आणि ती हॉटेल्स चालवण्यासाठी शेजारच्या हॉटेल्सवर खोट्या कारवायां करवून घेतल्या. वानखेडे आणि कंबोज हे ७ तारखेला ओशिविरा कब्रस्तानाच्या बाहेर भेटले. त्याचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचा प्रयत्न केला. तिथल्या स्थानिक लोकांनी याबाबत माहिती दिली. तिथे पोलिसांचे सीसीटीव्ही बंद होते त्यामुळे फूटेज मिळू शकले नाही असेही मलिक यांनी सांगितले.

सॅम डिसूझाने हवाल्याची रक्कम दिल्लीला पाठवली. हवालावाला म्हणतो की हवाल्याची रिसिट असते का? नंबीयारच्या ऑफिसमध्ये आरकेबी म्हणजेच राजकुमार बजाजचा व्हिडिओ नवाब मलिक यांनी शेअर केला. बजाजकडून जे पैसे देत नाहीत त्यांना एनसीबीच्या नावाने धमकी दिली जाते. रुबिना नावाच्या ड्रग्ज पेडलरचं लेटर आलंय. वानखेडेंची आर्मी ड्रग्ज पेडलर्सकडूनसुद्धा पैसे उकळते असा आरोप मलिक यांनी केला.

वानखेडेंनी मुंबईला पाताळलोक केलं

वानखेडेंनी मुंबईला पाताळलोक केलं असा घणाघात नवाब मलिक यांनी केला. मी चुकीच्या लोकांविरोधात लढतोय. शहरात ड्रग्जच्या नावावर निरपराध लोकांना घाबरवलं जात आहे. हजारो कोटींची वसुली होत आहे याच्या विरोधात मी लढतोय. गेल्या महिन्याभरापासून ही बातमी चर्चेत आहे. एनसीबीच्या महासंचालकांनी वक्तव्य केलं होतं की, पहिल्यांदाच समुद्रात कारवाई झाली. पण खरंतर असं काहीच नव्हतं. पब्लिसिटीचा स्टंट होता हा, लोकांना टार्गेट केलं गेलं. आर्यनचं अपहरण केलं आणि खंडणीची मागणी केली गेली असा आरोप मलिक यांनी केला.

सहा प्रकरणांतून वानखेडेंना वगळलं आहे. ज्या गुन्ह्यात चार्जशीट दाखल केली आहे त्याचा संजय सिंह काय तपास करणार असा प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला. याशिवाय २६ प्रकरणांचा तपाससुद्धा करावा असंही मलिक म्हणाले. जीव धोक्यात घालून मी ही लढाई लढतोय आणि याचा शेवट करणारच असंही मलिक म्हणाले.

व्हीलन तुरुंगात जाईपर्यंत पिक्चर संपणार नाही

वानखेडे कुणाला काय फोन करतात याबद्दल मी काही बोलणार नाही, त्यांची प्रायव्हेट आर्मी अॅक्टिव्ह आहे. ११०० कोटींच्या घोटाळ्याची एक फाइल देतोय, मोहित कंबोजने हा घोटाळा केला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. हा इंटरव्हलचा पिक्चर नाही, किंवा दोन भागातला चित्रपट नाही. जोपर्यंत व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर संपणार नाही असे मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हॉटेल ललितचं काय कनेक्शन?

ललित मध्ये महिने सुनिल पाटीलच्या नावाने रूम बूक होत्या. प्रायव्हेट आर्मी तिथून काम करत होती. ललित हॉटेलची माहिती पगारेने दिली. मनिष भानुषाली, सॅम डिसूझा तिथे यायचे, ड्रग्जसुद्धा घेतलं जात होतं. वानखेडेंच्या प्रवक्त्यांनी काही स्क्रीनशॉटही दिले, सुनिल पाटील आणि सॅम डिसूझा यांच्यातील चर्चेबद्दल माहिती दिल्याचं मलिक म्हणाले.

कासिम खान हा मुंबईच्या पालक मंत्र्यांना फोर्स करत होता, मंत्र्यांच्या मुलांना घेऊन जाणार होता. अनेक मंत्र्यांच्या मुलांना ट्रॅप करत होता असा दावा मलिक यांनी केला. सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होता का? कासिम खानला का पकडलं नाही? मुंबईच्या एसआयटीनेसुद्धा याची चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचं मलिक यांनी सांगितलं.

उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र करण्याचा कट

राज्य आणि केंद्र यांच्यातली लढाई नाही, चांडाळ चौकडी एनसीबीमध्ये आहे त्यांना बाहेर काढा. त्यांच्यामुळे बदनामी होत आहे, त्यांची चौकशी करा, देश नशामुक्त कऱण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहे असंही मलिक यांनी म्हटलं. आम्ही शहरात ड्रग्ज बंद व्हावं यासाठी प्रयत्न केले. पण अशी चांडाळ चौकडी राहिली तर ड्रग्ज बंद होणार नाही. उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र करण्याचा कट होता असाही आरोप नवाब मलिक यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com