Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी साधेपणानं वाढदिवस केला साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Supriya Sule

राजकीय नेत्यांचा वाढदिवस म्हटलं की मोठ-मोठे बॅनर, कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी पहायला मिळते.

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी साधेपणानं वाढदिवस केला साजरा

राजकीय नेत्यांचा वाढदिवस म्हटलं की मोठ-मोठे बॅनर, कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी पहायला मिळते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या काही दिवसांपासून सर्व नेते आपला वाढदिवस साधेपणात आणि घरातच साजरा करत आहेत.

हेही वाचा: 'महाराष्ट्र, झारखंड, राजस्थानपाठोपाठ टीएमसीचीही शिवसेनेसारखीच अवस्था होईल'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांचा 30 जून रोजी वाढदिवस आहे. त्यांनीही आपल्या घरीच वाढदिवस साधेपणानं साजरा केला आहे. वाढदिवसाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: 'हिंदुत्व.. हिंदुत्व म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी आहेत'

दरवर्षी सुप्रिया सुळे या कुटुंबीयांसोबत आपला वाढदिवस साजरा करत असतात. याही वर्षी सुप्रिया सुळे यांनी आपला वाढदिवस साधेपणाने घरीच साजरा केला. मागील वाढदिवसादिनी त्यांची मुलगी रेवतीच्या 'खास गिफ्ट'नं सुप्रिया सुळे भारावून गेल्या होत्या. "हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट.. असं म्हणत त्यांनी लेकीचं कौतुक केलं होतं.

Web Title: As Soon As The Thackeray Government Collapsed Supriya Sule Celebrated Her Birthday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..