Pankaja Munde : पंकजा मुंडेंना 'एमआयएम'ने आधीच दिली ऑफर; ओवैसी म्हणाले, त्यांना आम्ही...

pankaja munde
pankaja mundeesakal
Updated on

मुंबईः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये होत असलेली घुसमट लपून राहिलेली नाही. काल त्यांना के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने ऑफर दिली होती. आज औवेसी यांनी माध्यमांशी बोलतांना एमआयएमने दिलेल्या ऑफरबद्दल माहिती दिली आहे.

२०१९ आणि त्याही पूर्वीपासून पंकजा मुंडे यांना भाजपमधून अंतर्गत विरोध होत आलेला आहे. हा विरोध भागवत कराड यांना केंद्रात राज्यमंत्रीपद दिल्यांतर उफाळून आला. कराडांऐवजी प्रितम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु भाजपने खेळी केली.

pankaja munde
Eknath Shinde: "हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करा, पण..." ; एकनाथ शिंदेंचे आव्हान

त्यानंतर अनेकदा पंकजांना डावलण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वितुष्ट लपून राहिलेलं नाही. त्यातच काल त्यांना महाराष्ट्रात रुजू पाहणाऱ्या बीआरएस पक्षाने ऑफर दिली.

बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी देशभरात भाजप वाढवण्याचं काम केलं. परंतु आज त्यांची मुलगी पंकजा यांच्यावर वारंवार अन्याय होत आहे. त्यामुळे आम्ही पंकजा मुंडे यांना पक्षामध्ये घेण्यासाठी चर्चा करु, केसीआर त्यांना नक्कीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवतील. यावर पंकजा मुंडे यांची काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

pankaja munde
Wagner Group : पुतीन यांचा शेफ ते भाडोत्री सैन्याचा लीडर! कोण आहे रशियाच्या अध्यक्षांना चॅलेंज देणारा येवगेनी प्रिगोझिन?

मात्र आज एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, आम्ही दोन वर्षे आधीच पंकजा मुंडे यांच्याशी बातचित केली होती. इम्तियाज जलील यांना याची कुणकुण लागली. त्यामुळे त्यांनीच त्यांच्याशी बोलणी केली परंतु त्यांनी यात लक्ष घातलं नाही.

ओवैसींच्या या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एक तर पंकजा मुंडे यांचं शिवसेनेशी जवळीकतेचं नातं आहे. त्यात त्यांना या पक्षातून तर कधी त्या पक्षातून ऑफर येत राहतात. मागच्या आठवड्यात तर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अद्यापही पंकजा मुंडे यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.