Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा; स्वत: शिंदेंनीच सांगितलं विठूरायाकडं काय मागितलं..

आषाढी एकादशीच्या शुभदिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार विठ्ठलाची शासकीय महापूजा केली.
Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde
Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shindeesakal
Summary

यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले.

आषाढी एकादशीच्या शुभदिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप डोळ्यात साठवून ठेवत त्यांची मनोभावे आराधना करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी विठुरायाचे आभार मानले.

Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde
Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde

राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले.

Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde
Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde

तसेच राज्यातील जनता सुखी समाधानी आणि आनंदी रहावी हीच मागणी विठुरायाच्या चरणी मागितल्याचे सांगितले. यंदा राज्यातील युती सरकारला एक वर्षे पूर्ण होत असून गेल्या वर्षभरात अनेक विघ्न अडचणी आल्या.

Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde
Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde

मात्र, विठुरायाच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरळीतपणे करता येणे शक्य झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. पंढरपूर मंदिराच्या विकास आराखड्याबाबत सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde
Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde

तसेच पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदीरातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्यात आला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. तसेच पंढरपूर शहरातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी 109 कोटी तर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी 108 कोटी रुपये मंजूर केल्याचे यासमयी जाहीर केले.

Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde
Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मंत्री दादाजी भुसे, आमदार भरतशेठ गोगावले आमदार समाधान अवताडे, आमदार मंगेश चव्हाण, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे गहिनीमहाराज औसेकर तसेच त्यांचे सर्व सहकारी आणि वारकरी बंधू भगिनी उपस्थित होते.

Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde
Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com