Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी
Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी ही केवळ धार्मिक परंपरा नसून, ती भक्तीचा महासागर आहे. हजारो वारकरी विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे वारी करतात. "विठ्ठल! विठ्ठल!"च्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. पंढरपूरचा विठोबा आणि रुक्मिणीमातेचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये एकत्र येतात.