
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून वैष्णव गडाची ओळख आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो भक्त वैष्णव गडावर येऊन विठ्ठल रुक्माईची दर्शन घेतात. वैष्णव गडावर सकाळी ४ वाजता डॉ. प्रदीप हुसे व डॉ. अंजली हुसे दांपत्यच्या हस्ते विठ्ठल रुक्माईची महापूजा संपन्न झाली. यंदा डॉ. हुसे दाम्पत्याना पुजेचा मान मिळाला होता. यावेळी ह.भ.प. सानप गुरुजी, पंढरीनाथ घुगे, संस्थांचे विश्वस्त, उमेशचंद्र हूशे, डॉ. राजेंद्र हुशे,खुशालराव नागरे, डॉ. शिवानंद जायभाये, डॉ. विलास खुरपे, संजय सांगळे तसेच हुसे परिवारातील सदस्य, उपस्थित होते.