पंढरपूर - आषाढी वारीतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा पोलिस विभागाकडून एआय तंत्रज्ञानाचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर होणार आहे. विशेष म्हणजे कोणत्या भागात किती भाविकांची संख्या आहे, याचीदेखील एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. या प्रणालीसाठी सहा ड्रोनची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.