निवडणूक न लढविण्याचा सल्ला देणाऱ्या तावडेंना अशोक चव्हाणांनी दिले प्रत्युत्तर...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

"मी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्‍या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे." असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपनेते विनोद तावडे यांना लगावला आहे.

पुणे : "मी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्‍या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे." असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपनेते विनोद तावडे यांना लगावला आहे.

भारतीय जनता पक्षाचे मंत्री असलेल्या विनोद तावडे यांना अखेरपर्यंत विधानसभेची उमेदवारी पक्षाकडून दिली गेली नाही. विधानसभेसाठी त्यांचा पत्ता कट झाल्यानंतर चव्हाण यांनी त्यांच्या ट्विटवर तावडेंना वरील टोला लगावला आहे. तसेच, एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असेही त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तावडे यांनी चव्हाण यांना निवडणूक न लढविण्याचा सल्ला देत, काँग्रेस व चव्हाण यांच्यावर टिका केली होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan has replied to Vinod Tawde he advised Chavan to not contest Vidhan Sabha election