मोदींच्या श्वेतपत्रिकेत आदर्शचा उल्लेख अन् अशोक चव्हाण भाजपमध्ये? काय होता काँग्रेसला घरघर लावणारा आदर्श स्कॅम

Ashok Chavan resignation from Congress : केंद्रातील मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी लोकसभेत २०१४ पूर्वीच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातील एक श्वेतपत्रिका सादर केली आहे.
Ashok Chavan resignation from Congress
Ashok Chavan resignation from Congress

Ashok Chavan resignation from Congress : केंद्रातील मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी लोकसभेत २०१४ पूर्वीच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातील एक श्वेतपत्रिका सादर केली आहे. यामध्ये युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळातील आर्थिक गैरव्यवस्थापनाबाबत भाष्य करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने काढलेल्या या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. श्वेतपत्रिकेत या घोटाळ्याचा उल्लेख असल्यानेच अशोक चव्हाण यांनी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आदर्श घोटाळ्याची अद्याप ट्रायल सुरु असल्याचे देखील या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे.

केंद्र सरकारने काढलेल्या या श्वेतपत्रिकेत युपीए सरकारच्या काळात झालेल्या अनेक घोटाळ्यांचा उल्लेख आहे. यामध्ये काँग्रेसला घरघर लावणाऱ्या त्या आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक अनियमितता झाल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. रक्षा भूमी परियोजना अपार्टमेंट अलॉटमेटं प्रकरणात झालेल्या अनियमिततांशी संबंधीत हे प्रकरण कोर्टाच्या ट्रायल स्टेजमध्ये असल्याचे श्वेतपत्रिकेत सांगण्यात आले आहे.

Ashok Chavan resignation from Congress
Rapido Rider : माणुसकी संपली का? पेट्रोल संपल्यावर बाईकवरून उतरण्यास नकार, रॅपिडो चालकाचा गाडी ढकलतानाचा Video Viral

आदर्श घोटाळा काय होता?

आदर्श हाऊसींग घोटाळ्यात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाबद्दल सांगायचे झाल्यास, मुंबईतील कुलाबा येथे महाराष्ट्र शासनाने आदर्श गृहनिर्माण संस्था स्थापन केली होती.

एकूण 31 मजले असणारी ही इमारत युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा आणि भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आली होती. मात्र सोसायटीच्या स्थापनेनंतर नियम मोडून या सोसायटीचे फ्लॅट्स अधिकारी, राजकारणी आणि लष्करी अधिकाऱ्यांना अत्यंत कमी किंमतीत विकण्यात आले आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती उघड झाली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. 2010 मध्ये हा आदर्श हाऊसींग घोटाळा उघडकीस आला होता.

Ashok Chavan resignation from Congress
Ashok Chavan Resigns : आम्ही अजूनही काँग्रेसमध्येच...; चव्हाणांसोबत पक्ष सोडल्याच्या चर्चांवर 'या' आमदारांचं स्पष्टीकरण

पक्ष सोडताना चव्हाण काय म्हणाले?

काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या कारणाबद्दल अशोक चव्हाणांनी कुठलीही भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाहीये. मला कुठलीही पक्षांतर्गत जाहीर वाच्यता करायची नाही. कुणाचाही उणीदुणी काढायची नाही. मी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम केलं आहे. आता वेगळ्या पर्यायाचा विचार करायला हवा. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. मी उद्याप इतर कुठल्याही पक्षात सामिल होण्याचा निर्णय घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीचं कारण सांगितलं जाऊ शकत नाही. मी काल संध्याकाळपर्यंत पक्षाच्या बैठकीत सहभागी होतो असे चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

इतर पक्षात दाखल होण्याबाबत बोलतना चव्हण म्हणाले की, मी कुठल्याही आमदाराशी चर्चा केलेली नाही. माझा राजीनाम्याचा आणि कुठल्याही श्वेतपत्रिकेचा काहीही संबंध नाही. माझी कुणाबद्दलही तक्रार नाही. मी माझी कुठलीही मागणी कुठल्याही पक्षासमोर ठेवलेली नाही किंवा चर्चाही केलेली नाही. मी स्वतः वेळ घेऊन मग निर्णय घेणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं.

Ashok Chavan resignation from Congress
Ashok Chavan Resignation : "अचानक असं काय घडलं? मला वाटतं की...", अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर ठाकरे स्पष्टच बोलले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com