मोदींची स्टंटबाजी हॉलिवूडला लाजवणारी, अशोक चव्हाणांची टीका

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण
Summary

कोरोना काळात तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की झाली. अहोरात्र जळणाऱ्या चिता, गंगेत वाहणारे मृतदेह सर्व जगाने पाहिले.

औरंगाबाद : केंद्रातील सरकारला सात वर्षे पूर्ण (Seven Years Of Modi Government) झाली. सरकारला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा द्याव्यात अशी स्थिती नाही. उलट सरकारमधील मंत्रीही एकमेकांना शुभेच्छा देऊ शकत नाहीत, इतकी निराशाजनक कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे, अशी टीका सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Public Works Department Minister Ashok Chavan) यांनी केली. केंद्राच्या सात वर्षे पूर्तीनिमित्त चव्हाण यांनी रविवारी (ता. ३०) पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधला. पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पोकळ भाषणे, केवळ दमदारपणे मांडणी करून खोटी आश्वासने दिली. हॉलिवूड (Hollywood), बॉलीवूडलाही (Bollywood) लाजवेल अशी स्टंटबाजी केली. ही सर्व जुमलेबाजी होती. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या कामगिरीबद्दल सातत्याने भाष्य करून त्रुटी लक्षात आणून दिल्या. मात्र विरोधकांची हेटाळणी करणे हेच मोदी यांचे धोरण असल्याचे ते म्हणाले. (Ashok Chavan Said, Modi Government Performance Not Good)

अशोक चव्हाण
प्राध्यापकांच्या रिक्त जागांनी संलग्नीकरण होऊ शकते रद्द!

कोरोनाकाळात नाचक्की

कोरोना (Corona) काळात तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की झाली. अहोरात्र जळणाऱ्या चिता, गंगेत वाहणारे मृतदेह सर्व जगाने पाहिले. नागरिकांच्या अंत्यसंस्काराचे हक्कही हिरावण्याचे काम केंद्राने केले. काँग्रेसला गौरवशाली इतिहास आहे, परंपरा आहे. मात्र आम्ही कमी नाहीत हे मोदी सरकार दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील लोकांचा विचार न करता इतर देशांना लसींचा निर्यात केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोलने शंभरी ओलांडली. गॅस सिलिंडरने ८०० रुपये पार केले. भारतापेक्षा बांगलादेश पुढे गेला ही वस्तुस्थिती असल्याचे सांगून चव्हाण यांनी केंद्राकडून नियमाप्रमाणे जीएसटीचा वाटा राज्याला मिळायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पीएम केअर निधीतून दिलेले व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. मुळात ‘पीएम केअर’ मध्ये किती पैसा आला, कसा खर्च झाला हे लोकांना कळाले पाहिजे, त्यात पारदर्शकता असली पाहिजे, असे मत व्यक्त करून केंद्राच्या निधीची वाट न पाहता राज्याने प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन निधीतून कोरोनाकाळात मोठे काम उभे केल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक चव्हाण
पिकविमा कंपन्यांची नार्को टेस्ट व्हावी, अब्दुल सत्तारांची मागणी

फडणवीस सरकारने फसवले

मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द होणे, हे कॉंग्रेचे अपयश नाही. उलट हातात हात घेऊन चालण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे. न्यायालयात बाजू मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. उलट फडणवीस सरकारने (Fadanvis Government) निवडणुकीच्या तोंडावर कायदा करून दिशाभूल केली. कॉंग्रेस पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बाजूने आहे. मात्र, कायदेशीर बाबींचा हा विषय असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. मराठवाड्यातील (Marathwada) रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत असून मागच्या सरकारने नेमलेल्या चुकीच्या ठेकेदारांमुळे कामे रखडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

संभाजीराजेंची भूमिका चांगली

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली. संभाजीराजेंची भूमिका चांगली आहे. ते सर्वांना भेटून एकमत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यातून सध्यातरी वेगळा अर्थ काढता येणार नाही. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. विनायक मेटे हे राजकीय फायदा उचलण्यासाठी ऊठसूट दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत. त्यांनी कायदेशीर भूमिका घ्यावी, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असे चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com