Ashok Chavan Audio Clip : “थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा”; अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

Viral Audio : नांदेडच्या मुदखेड तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश न झाल्याने स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आणि त्यांच्या एका कार्यकर्त्यामधील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Ashok Chavan and Worker’s Alleged Conversation Goes Viral

Ashok Chavan and Worker’s Alleged Conversation Goes Viral

esakal

Updated on: 

संजय सूर्यवंशी

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश न झाल्याने स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण आणि त्यांच्या एका कार्यकर्त्यामधील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपची स्वतंत्रपणे सत्यता पडताळलेली नाही. मात्र, क्लिपमध्ये मुदखेड तालुका दुष्काळाच्या यादीतून का वगळण्यात आला, असा सवाल कार्यकर्ता चव्हाण यांना करताना ऐकू येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com