Land Scam: देवस्थानची शेकडो एकर जमीन लाटली; भाजपचा बडा नेता अडकण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed land Scam

Land Scam: देवस्थानची शेकडो एकर जमीन लाटली; भाजपचा बडा नेता अडकण्याची शक्यता

बीडः जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी माफियांनी लाटल्याचे प्रकार घडलेले आहे. या प्रकरणी दाखल याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने तक्रारदाराच्या निवेदनाला तक्रार म्हणून गृहीत धरुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात बीड जिल्ह्यातल्या भूमाफियांनी आणि बड्या पुढाऱ्यांनी सर्रास जमिनी लाटल्याचे प्रकार घडले आहेत. देवस्थान भूखंडाच्या सातबारावर नावं लावून उखळ पांढरं करुन घेण्यात आलेलं आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी माफियांच्या घशातून जमिनी काढून घेण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी लढा सुरु केलेला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील विठोबा, पिंपळेश्वर देवस्थानासह आठ वेगवेगळ्या देवस्थानांच्या जमिन लाटण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणी राम खाडे यांनी ईडीकडेही तक्रार दाखल केलेली आहे.

यासंदर्भातील याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. तक्रारदाराच्या निवेदनाला तक्रार समजून गुन्हा दाखल करा, असे आदेश कोर्टाने दिलेत. त्यामुळे भूमाफियांचे धाबं दाणाणले आहेत. विशेष म्हणजे बीडमधील एक बडा भाजप नेता यामध्ये अडकण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

टॅग्स :BeedBjpland mafia