आसामच्या मुख्यमंत्र्याचे CM शिंदेंना पत्र; व्यक्त केली तीव्र नाराजी, काय आहे कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ask Bachchu Kadu to apologise for stray dogs comment Assam CM writes to Eknath Shinde

आसामच्या मुख्यमंत्र्याचे CM शिंदेंना पत्र; व्यक्त केली तीव्र नाराजी, काय आहे कारण?

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट पत्र लिहित तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरमा यांच्या पत्रामुळे एकनाथ शिंदे यांच टेन्शन वाढलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Ask Bachchu Kadu to apologise for stray dogs comment Assam CM writes to Eknath Shinde)

राज्याचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये पाठवण्याच्या प्रस्तावावर सरमा यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विधान मागे घेण्याची मागणी केली आहे. हे पत्र त्यांनी ट्विट केले आहे. सरमा म्हणाले की, मी आणि आसामचे नागरिक या वक्तव्यामुळे निराश झाले आहेत.

काय म्हटले आहे पत्रात?

संबंधित आमदाराच्या वक्तव्यामुळे आसामच्या लोकांसह मी अत्यंत निराश झाले आहे. या वक्तव्यातून असे स्पष्ट होते की राज्याच्या संस्कृतीबाबत संबंधित आमदाराचे पुर्वग्रह आणि अज्ञान दिसून येते.

संबंधित आमदाराने आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि खेद व्यक्त करणार प्रसिद्धीपत्रक काढावे. अशा विनंती सरमा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

काय आहे प्रकरण?

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातखळकर यांनी भटक्या कुत्र्यांवरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर सुरु असलेल्या चर्चेमध्ये अचलपूरचे अपक्ष आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आसामबाबत वादग्रस्त विधान केले होते.

महाराष्ट्रातील सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवावेत असे वादग्रस्त विधान केले होते . महाराष्ट्रातील सर्व भटके कुत्रे आसामला पाठवा, असे कडू म्हणाले होते. तिथे त्यांची किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्याचे मांस खातात. तिथले लोक कुत्र्याचे मांस खातात जसे आपण हरण खातो. या कुत्र्यांची खरेदी-विक्री केली जाईल. गुवाहाटीला गेल्यावर आम्हाला याची माहिती मिळाली.