मुंबई - ‘राज्यात एखाद्या व्यक्तीला मराठीतून बोलता येत नसेल तर त्याला मारहाण केली जात आहे. एखाद्याला कुणी मारहाण केली तर त्याला लगेच मराठी बोलता येणार आहे का? हे शक्य आहे का? क्षुद्र राजकारणासाठी या गोष्टी राज्यात व्हायला नको,’ असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी मुंबईत केले.