
Rahul Narwekar : सरन्यायाधीशांनी फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले...
मुंबई - विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्यामध्ये सुनावणी करून त्याबाबतची रूपरेषाही ठरवावी कार्यवाही करावी. तसेच दोन आठवड्यानंतर त्याबाबतची सगळी माहिती सुप्रीम कोर्टात द्यावी, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारले. त्यावर नार्वेकर यांची प्रतिक्रिया आली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले की, अद्याप माझ्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयातील कोणतीही माहिती आलेली नाही. संपूर्ण माहिती काय आहे, ती घ्यावी लागेल. त्यानंतर पुढच्या कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. उलट सुप्रिम कोर्टाने हे मान्य केलं की, विधानसभा अध्यक्षपद संवैधानिक पद आहे.
दरम्यान कारवाई लवकरात लवकर होईल. कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. त्याचवेळी घाईने निर्णय घेतला जाणार नसल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं.
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी आमदार अपात्रेताबाबत अजुन काहीच झालं नाही का, असा प्रश्न विचारत, म्हटलं की विधानसभा अध्यक्ष घटनेच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत कार्यवाही अनिश्चित काळासाठी लांबवू शकत नाहीत. शिवाय न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा आदर करायलाच हवा, असही सरन्यायाधीश यांनी म्हटलं होतं.