Maharashtra-Vidhansabha
Maharashtra-Vidhansabhaelection

विधानसभेला खर्चाची मर्यादा 40 लाख रूपये! 30 ऑगस्टला अंतिम होणार मतदार यादी; प्रारूप यादीवर 41,894 हरकती; यादीत नावे नसल्याच्या सर्वाधिक हरकती

विधानसभेच्या प्रारूप यादीवर जिल्हाभरातून तब्बल ४१,८९४ हरकती प्राप्त झाल्या असून, त्यात सर्वाधिक हरकती यादीत नावे समाविष्ट करण्याच्याच आहेत. त्यानंतर ३,६७३ नावे यादीतून काढून टाकण्याच्या तर १०,१८८ जणांनी नावासह अन्य दुरुस्तीसाठी हरकती घेतल्या आहेत.
Published on

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता मतदार यादी अंतिम केली जात आहे. सध्या प्रारूप यादीवर जिल्हाभरातून तब्बल ४१ हजार ८९४ हरकती प्राप्त झाल्या असून, त्यात सर्वाधिक हरकती यादीत नावे समाविष्ट करण्याच्याच आहेत. त्यानंतर तीन हजार ६७३ नावे यादीतून काढून टाकण्याच्या तर १० हजार १८८ जणांनी नावासह अन्य बाबींच्या दुरुस्तीसाठी हरकती घेतल्या आहेत. ३० ऑगस्ट रोजी ही मतदार यादी अंतिम होणार आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांकडे मतदान ओळखपत्र होते, तरीदेखील त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मतदारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे विधानसभेच्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या २८ हजार मतदारांनी हरकती घेत नाव समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. त्या सर्व हरकतींचा निपटारा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्याच ईव्हीएम वापरल्या जाणार असून, त्याची दुरुस्ती व तपासणी देखील सुरू आहे. ३१ ऑगस्टनंतर त्या ईव्हीएम सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पोच केल्या जाणार आहेत. दरम्यान, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली तरीदेखील नवमतदारांना पुन्हा पुरवणी यादीच्या माध्यमातून नावे समाविष्ट करण्याची संधी असणार आहे.

मतदार यादीवरील हरकती

  • नावे समाविष्ट : २८,०३३

  • नावे डिलीट करणे : ३,६७३

  • नावात दुरुस्ती : १०,१८८

  • एकूण हरकती : ४१,८९४

मतदार यादी अंतिम करण्याची कार्यवाही सुरू

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. ३० ऑगस्ट रोजी यादी अंतिम होणार असून, त्यानंतर नव्याने समाविष्ट होणाऱ्या मतदारांची पुरवणी यादी तयार होईल. सध्या ‘इव्हीएम’ दुरुस्ती व अंतिम करण्याची कार्यवाही सुरू असून त्याचे कामही ३० ऑगस्टलाच पूर्ण होईल.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

विधानसभेला ४० लाखांची खर्च मर्यादा

लोकसभा निवडणुकीला प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ९५ लाख रुपये करण्यात आली होती. तर आता विधानसभेला उभारणाऱ्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा २८ लाख रुपयांवरून ४० लाख रुपये करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीत तेवढाच खर्च करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com