
- अविनाश साबापुरे
यवतमाळ - महाराष्ट्रात सामाजिक एकोपा टिकविण्यासाठी पोलिसांनी ‘जातीय सलोखा बैठका’ वाढविल्या आहेत. तरीही ‘अॅट्रॉसिटी’चे गुन्हे वाढत आहेत. गेल्या चार वर्षांत राज्यात तब्बल १८ हजार ७०३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मात्र त्यातीलही तब्बल ५९७ प्रकरणे पोलिस दप्तरी प्रलंबित आहेत.