
मुंबईत मेट्रो प्रकल्पाची वाट लावणाऱ्या तुमच्या सरकारची कुवतही सगळ्यांना माहित आहे
काल झालेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनावरुन पुन्हा एकदा केंद्र विरोधी राज्यसरकार असा वाद उफाळू आला आहे. दरम्यान, पुणे मेट्रोच्या (Pune Metro) मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी एक ट्विट करत भाजपावर (BJP) निशाणा साधला. रेटून ‘फेकणं’ ही भाजपाची नेहमीची सवय असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं. आता त्यांच्या या ट्विटवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी पलटवार केला आहे.
ते म्हणतात, रोहित पवार, प्रस्ताव तयार करणं आणि घोषणा करणं या पुढे तुमची उडी कधी गेलीच नाही. मेट्रो प्रकल्प तडीस कोणी लावला हे जनता जाणून आहे. मुंबईत मेट्रो प्रकल्पाची वाट लावणाऱ्या तुमच्या सरकारची कुवतही सगळ्यांना माहित आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ज्या मेट्रोचे कामचं पूर्ण झालेले नाही त्याचे उद्घाटन होतं असल्याचा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांना लगावला होता. त्यावर भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रियाही आल्या. दरम्यान, यानंतर रोहित पवार यांनी भाजपाच्या ट्विटला उत्तर दिलं होतं. रेटून ‘फेकणं’ ही भाजपाची नेहमीची सवय असली तरी लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून आणि खोटारड्या भाजपाला आरसा दाखवण्यासाठी 'मेट्रो प्रवासा'चा हा इतिहास आहे. २००९ ला पुणे व पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची सत्ता असताना मेट्रोचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
काय आहे भाजपाचे ट्विट
आदरणीय @PawarSpeaks जी, 50 वर्षीय राजकारणात तुम्ही किती किलोमीटरचे मेट्रो प्रकल्प पुण्यात केलात? ज्यांनी केलं त्यांचं कौतुक करण्यासाठी तरी मनाचा मोठेपणा दाखवा!ट्रायलसाठी लगबगीने गेलात, आता म्हणता अर्धवट काम? पवार साहेब हा फोटो पुणे मेट्रोतील आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.