Atul Bhatkhalkar : "मुलांना लग्नासाठी मुली मिळेना" शरद पवारांच्या वक्तव्यावर भातखळकर म्हणाले, राहुल, आदित्य... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Bhatkhalkar reaction on sharad pawar statement

Atul Bhatkhalkar : "मुलांना लग्नासाठी मुली मिळेना" शरद पवारांच्या वक्तव्यावर भातखळकर म्हणाले, राहुल, आदित्य...

Atul Bhatkhalkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुण्यात बोलताना बेरोजगारीवर भाष्य केले. बेरोजगारीमुळे राज्यातील अविवाहित मुलांची लग्ने होत नसल्याचे मत शरद पवार यांनी काल (बुधवार) पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. त्यामुळे चर्चेला उधान आले आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. या दोन्ही सरकारची नीती ही जनतेला महागाईत लोटण्याची आहे. सध्या महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे शरद पवार म्हणाले. दरम्यान भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंना टोमणा लगावला आहे. (Atul Bhatkhalkar reaction on sharad pawar statement)

"खरं आहे पवार साहेब… राहुल,आदीत्य असे कित्येक राजकीय बेरोजगार उदाहरणा सहित सांगता येतील", असे अतुल भातखळकर म्हणाले. त्यामुळे चर्चेला उधान आले आहे. एकप्रकारे अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची टिंगल उडवली आहे.

हेही वाचा: Amol Kolhe : अमोल कोल्हेंबाबत वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले...

सध्याच्या राज्यकर्त्यांची नीती ही शेतकऱ्यांच्या घामाला किंमत द्यायची नाही. उलट दलालांना संरक्षण देणारे कायदे करायचे आणि त्यांना या कायद्याच्या माध्यमातून संरक्षण द्यायचे आणि सर्वसामान्यांना महागाईत लोटून द्यायचे, अशी आहे. याशिवाय महाराष्ट्रातील उद्योग अन्य राज्यात घेऊन जायचे. नवीन उद्योग राज्यात येण्यासाठी सवलती द्यायच्या नाहीत. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा: Layoffs 2023 : नव्या वर्षात लाखो कर्मचारी गमावतील नोकऱ्या! धक्कादायक अहवाल जाहीर

सत्तेत येण्यासाठी मोठी आश्‍वासने दिली. परंतु ती पाळता येत नसल्याने, लोकांचे या विषयावरील लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी जाणीवपूर्वक जाती-जातींत आणि धर्मा-धर्मांत तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला आहे. 

हेही वाचा: Uddhav Thackrey : नाशिकमधील पडझड थांबणार? खुद्द उद्धव ठाकरे ...